ताज्याघडामोडी

ती माझी आहे, लांब रहा; प्रेम त्रिकोणातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

“ती माझी आहे”, असं म्हणत दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील (वय २४) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो सजावटीचं काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी वनदेवी नगर येथील सय्यद इर्शाद (वय २३) आणि शोएब अन्सारी (वय २३) या दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संतोष नगर झोपडपट्टी संकुलात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली, त्याच्यावर दोघांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ जखमी मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून जाताना दिसले. संशयास्पदरीत्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. सुरुवातीला आरोपींनी त्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली असता दोघांनीही हल्ल्याची कबुली दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीशी लग्न करण्याच्या वादातून हा हल्ला झाला. जखमी सोहेलचे एका तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. म्हणून चार वर्षांपूर्वी त्याने मुलीला आपल्या घरी आणले होते. दरम्यान, तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी शोएब अन्सारीशी भेट झाली. हळूहळू त्यांच्या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, याची कुणकुण सोहेललाही लागली. यावरून सोहेल आणि शोएबमध्ये अनेकदा वाद झाला होता. आरोपीने सोहेलला मुलीपासून दूर राहण्याची सूचना केली होती, मात्र त्याने नकार दिला. यावरून दोन दिवसांपूर्वी सोहेलचे आरोपींसोबत भांडण झाले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago