ताज्याघडामोडी

सासू-सासरे आणि नवऱ्याला खाऊ घातल्या झोपेच्या गोळ्या आणि बॉयफ्रेंडसोबत मिळून केलं धक्कादायक कृत्य

लग्नकार्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. भांडण, मस्ती, मज्जा, रुसवे-फुगवे सगळं काही लग्नात असतं. पण एक विचित्र प्रकरण एका लग्नासंबंधीत समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

खरंतर या प्रकरणात नववधूने तिच्या नवऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात मोठा गेम प्लान केला. ही घटना राजस्थानमधील बारनच्या शहााबाद येथील आहे. येथे एक नववधू आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना चकमा देऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. एवढंच काय तर नववधू रोख रक्कम आणि दागिने चोरुन पळाली.

पोलिसांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी प्रियकरासह पळून गेलेल्या नववधूला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने प्रियकरासह मिळून तिच्या सासरच्या लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, त्यानंतर घरातील मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला.

आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. 2 मार्च रोजी पीडित पुरणचंद किराड यांनी शहााबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये सांगितले की, त्यांची सून उर्मिला, मुकेश गुर्जर आणि दिलीप यांच्यासोबत पळून गेली, शिवाय तिने घरातील दागिने चोरले. या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, चांदीचे 3 जोडे पायघोळ, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 50 हजार रुपये चोरीला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी पकडले देखील गेले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 day ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago