ताज्याघडामोडी

त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर…; तरुणाला धमकी दिली अन् नंतर त्याचा मृतदेहच सापडला

आष्टा या ठिकाणी एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५,असे या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधतून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

आष्टा शहरातल्या नागावर रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला असता सदर तरुणाचा गळा घोटून केल्याचं निदर्शनास आले. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५, मुळगाव सोन्याळ,तालुका जत, सध्या राहणार आष्टा-नागाव रोड,असे तरुणाचं नाव आहे. या हत्ये प्रकरणी आष्टा पोलिसांनी नवनाथ विठ्ठल ऐवळे, या संशयित तरुणास अटक केली आहे.

शिवाजी कुलाळ, हा वन विभागाच्या नागाव रोडवरील जागेवरील झोपडपट्टी मध्ये राहत होता. उसाच्या वाडा विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय होता. झोपडी शेजारीच सोशल नवनाथ ऐवळे राहत होता.काही दिवसांपूर्वी शिवाजी आणि नवनाथ या दोघांच्या मध्ये जोरात भांडण झाले होते. नवनाथ याच्या एका नात्यातील महिलेबरोबर शिवाजीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय नवनाथ याला होता. या विषयावरून त्या दोघांमध्ये भांडण होऊन, तू त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी नवनाथ याने मृत शिवाजी याला दिली होती. सदरची भांडण ही शिवाजी याचा भाऊ विलास कुलाळ यांनी सोडवली होती.

त्यामुळे आपल्या भावाचा खून हा नवनाथ यांनीच केल्याचा संशय व्यक्त करत विलास कुलाळ यांनी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये नवनाथ याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार आष्टा पोलिसांनी नवनाथ ऐवळे याला अटक केली आहे, अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago