पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून, ललिता या ब्युटी पार्लरमध्ये काम करायच्या. त्यांना दोन मुली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा पत्नी ललिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असून, दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहतात. ललिता या मुलींचा सांभाळ करायच्या. मंगळवारी दुपारी नळ फिटिंग करणारा युवक कामानिमित्त ललिता यांच्याकडे आला. याबाबत अमरला कळताच त्याने ललिता यांच्याशी वाद घातला. बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ललिता यांनी कळमना पोलिस स्टेशनमध्ये अमरविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. ललिता घरी परतल्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अमरने पुन्हा ललिता यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांच्या मुली पहिल्या माळ्यावरील खोलीत होत्या.
संतप्त अमरने हतोड्याने ललितांच्या डोक्यावर वार केले. ललिता यांनी आरडाओरड केली. त्यांच्या मुली तळमजल्यावरील खोलीत आल्या. तोपर्यंत ललिता यांचा मृत्यू झाला होता. मुलींना धायमोकलून रडायला सुरूवात केली. शेजारी जमले. तत्पूर्वी अमर हा कळमना पोलिस ठाणे गाठून हजर झाला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कळमना पोलिसांचा ताफा मिनीमातानगरमध्ये पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अमरला अटक केली.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…