ताज्याघडामोडी

भाजीवाल्याच्या खात्यात 172 कोटी! बँक बॅलन्स पाहून आयकर अधिकारीही हबकले

गाझीपूर येथील एका भाजी विक्रेत्याला १७२.८१ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्नन न भरल्यामुळे आयकर विभागाने नोटिस जारी केली आहे. विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.आयकर विभागाच्या नोटिसबाबत व बँक खात्यातील रक्कमेबाबत त्याला काहीच ठावूक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसंच, कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक खाते उघडल्याचा दावा त्याने केला आहे.

विनोद रस्तोगी यासा आयकर विभागाच्या वाराणसी कार्यालयातून नोटिस पाठवण्यात आली आहे. नोटिशीमध्ये म्हटल्यानुसार, युनियन बँकेत त्यांच्या नावे असलेल्या खात्यात १७२. ८ कोटी इतकी रक्कम आहे. त्यावर त्यांनी अद्याप टॅक्स भरलेला नाहीये, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. नोटिस मिळाल्यानंतर रस्तोगी आयकर विभागाच्या कार्यालयात पोहोचले व तिथून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीत जे बँक खाते नमूद केलं आहे. ते त्यांचे नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच, या आधी कधीच इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार केला नाहीये, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणीतरी त्यांच्या कागदपत्राचा दुरुपयोग करुन बँक खाते खोलले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

रस्तोगी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करु, असं आश्वासन दिलं आहे. २६ फेब्रुवारी रोजी रस्तोगी यांना आयकर विभागाकडून नोटिस आली होती. यात तुमच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम कशी आली आणि इनमक सोर्स काय आहे?, याचा खुलासा करण्यासं सांगितले होते. नोटिस मिळताच रस्तोगी यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. तिथे त्यांचे कागदपत्रे तपासण्यात आले आहेत. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीदेखील रस्तोगी यांना अशाच प्रकारची एक नोटिस आली होती, अशी चर्चा आहे.

आयकर विभाग आणि सायबर पोलिस संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. रस्तोगी यांना काही कागदपत्रे आणून देण्यास सांगितले आहेत. त्यांना याआधीही अशी नोटिस मिळाली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असं सायबर सेलचे प्रभारी वैभव मिश्रा यांनी म्हटलं आहे. तर, एकीकडे गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, या सगळ्या प्रकाराचा घाबरुन रस्तोगी आपल्या घराला टाळे लावून कुटुंबासोबत अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago