छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्यावरत तो थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हा मृतदेह तब्बल दोन महिने पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता आणि कोणाला याची कल्पनाही नाही.
बिलासपूरच्या उसलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय पतीला होता, त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती आहे. खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत:ला वाचवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध घेतला असता त्यांना त्या पाण्याच्या टाकीत शरीराचे अवयव असलेली एक पिशवी सापडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. बायकोचे कोणाशी तरी अफेअर आहे, असे त्याला वाटत होते. त्याच रागातून त्याने ही हत्या केली. सीता साहू असे मृत पत्नीचे नाव आहे. तर, पवन ठाकूर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सध्या पोलीस आरोपी पवन ठाकूरची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी आरोपी पवन ठाकूर याला बनावट नोटांसह अटक केली होती. याप्रकरणी पोलीस आरोपीच्या घरी शोध घेण्यासाठी पोहोचले होते. यानंतर येथील दृश्य पाहून पोलीसही हैराण झाले. आरोपीच्या घरातून पोलिसांना विचित्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी घराची झडती घेत असताना पाण्याची टाकी उघडली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या पाण्याच्या टाकीत पोलिसांना मृतदेहाचे छोटे तुकडे सापडले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बनावट नोटांचे बंडल आणि नोट मोजण्याचे मशीनही जप्त केले आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…