लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्याचे अनेक वेळा कानावर आले आहे. लग्न करण्याचे अमिष दाखवून तरुणींवर अत्याचार केला जातो. परंतु नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर अमानुष अत्याचार करत तिला गर्भवती देखील केले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, आकाश एकनाथ काळे ( वय २० वर्षे, रा. गंगासागर कॉलनी, गंगापूर रोड नाशिक ) याने अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून काळे याच्यावर पॉक्सो आणि बलात्काराच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संशयित काळे याने दिनांक १ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत लग्न करण्याचे आश्वासन देऊन स्वतःच्या घरी नेऊन वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यांनतर संबंधित पीडितेने कालांतराने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली. याचा संशयितास राग आल्याने त्याने तिला मारहाण केली. तसेच हा प्रकार तुझ्या घरी सांगेन अशी धमकी देखील दिली.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाने करीत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बरोबरच संबंधिताने महिलेची लाखो रुपयांची फसवणूकही केली होती . याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…