कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला आहे. कसब्यातील या प्रतिष्ठेच्या लढाईत रासने आणि धंगेकर यांनी एकमेकांवर टीकेच्या जोरदार फैरी झाडल्या होत्या. निकालानंतर देखील या दोन्ही नेत्यांचे शाब्दिक युद्ध सुरूच आहे. निकालानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘आज सत्तेत असल्याने लोक त्यांना नमस्कार करतात पण सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही’, असं म्हणत धंगेकरांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यानंतर हेमंत रसाने यांनी देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. असं म्हंटल होत.
रासने यांच्या या टीकेला आता रवींद्र धंगेकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ‘हेमंत रासने मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार. मी फडणवीसांना काहीच बोललो नाही. मी काही एवढा मोठा नाही पण फक्त एक कार्यकर्ता म्हणून विनंती केली. मात्र, मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडणून आलोय. तीन विधानसभा निवडणूका लढवल्यात. त्यामुळे रासनेंपेक्षा माझा कार्यकाळ मोठा आहे. रासने यांनी एकदा तो तपासून घ्यावा.’ असा टोला धंगेकर यांनी रासने यांना लगावला आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…