विकृत स्वभावामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन वक्तव्य केलं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा शुक्रवारी साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कला मंदिरात झाला. त्यावेळी छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. सातारचे प्रतापसिंह महाराज कधी झुकले नाहीत. पण, त्यांच्या वंशजांनी भाजपाशी तडजोडी केली, असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते.
संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत असतात. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थासाठीच केलेले विधान केले आहे. त्यांचा हा निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, अशा शब्दात उदयनराजेंनी राऊतांना सुनावलं. छत्रपतींचा आदर अनादर करण्याचा कोणाचा घास नाही, असे खासदार उदयनराजे भोसले निक्षून सांगितले.
तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिवगर्जना मेळाव्यात बोलताना केली होती.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…