डीजीसीए अधिकारी अजय पाल सिंग आणि त्यांची पत्नी मोनिका यांनी काही तासांच्या कालावधीत एकामागून एक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या हसत्या खेळत्या दाम्पत्याला टोकाचं पाऊल उचलण्यास कुठल्या गोष्टीने प्रवृत्त केले याबद्दल त्यांचे कुटुंबीय अंधारात आहेत. दोघांचा गेल्या वर्षीच विवाह झाला होता.
मोनिकाच्या कुटुंबीयांना गुरुवारी तिचा फोन आला होता. मोनिकाचा भाऊ सौरभने सांगितले, की ‘सकाळी १२-१२.३० वाजताच्या सुमारास मोनिकाने आमच्या वडिलांना फोन केला, की अजयने काहीतरी विषारी पदार्थ इंजेक्ट केल्याचे तिने सांगितले. माझ्या वडिलांनी तिला अजयला तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगितले… मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. आम्ही भोपाळहून विमानाचे तिकीट शोधत होतो, पण रात्री एकही तिकीट उपलब्ध नव्हतं. त्यामुळे आम्ही सकाळी दिल्लीला जायचं ठरवलं. मात्र, दोन-तीन तासांतच तिनेही आत्महत्या केल्याचं समजलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आम्हाला काहीतरी सांगितले असतं, तर आम्ही तिला मदत करु शकलो असतो, अशी हताश प्रतिक्रिया मोनिकाचा भाऊ सौरभने दिली.
“तिने ना कोणाची वाट पाहिली, ना साधा कोणाला फोन केला. अजयचा मृत्यू झाल्यानंतर, ती घरी परतली आणि तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. पोलिसांनी आम्हाला सांगितले की तिने काही मिनिटांतच आत्महत्या केली. काय चालले आहे हे आम्हाला कळायला हवे होते. त्यांना जीव का द्यावा लागला, हेच समजत नाही” असं मोनिकाचे वडील डॉ प्रेम किशोर म्हणाले.
मोनिका कधी कधी कॉलवर पती अजयसोबत होणाऱ्या भांडणांचा उल्लेख करायची, पण काही “गंभीर” वाटले नव्हते. दोघांनी गेल्या आठवड्यात मोनिकाचा वाढदिवस साजरा केला आणि सर्व काही सुरळीत सुरु होते, असेही तिच्या आईने सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…