महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.
संदीप देशपांडे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. ते एकटेच होते. त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच लोक बसले होते. त्यांच्या तोंडावर मास्क होते. या टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढवला. टोळक्यातील एकाने संदीप देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार संदीप देशपांडे यांनी हातावर झेलला. या झटापटीत एक फटका त्यांच्या पायावर बसला. हा सगळा प्रकार पाहून आजुबाजूचे लोक संदीप देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
संदीप देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नितीन सरदेसाई यांच्यासह मनसेचे स्थानिक नेते हिंदुजा रुग्णालयात देशपांडे यांना पाहण्यासाठी गेले आहेत. डॉक्टरांनी अद्याप देशपांडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली नाही. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे महानगरपालिकेतील घोटाळे बाहेर काढत असल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…