ताज्याघडामोडी

“निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही मविआ म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपाचा उमेदवार कसबा पेठेत सातत्याने निवडून येत होता. आधी गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांनी हा मतदारसंघ राखला होता.

यावेळी भाजपाच्या विरोधात रवींद्र धंगेकर हा अत्यंत योग्य उमेदवार आम्ही दिला होता. तिथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी अनेक वर्षे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो. रवींद्र हे काँग्रेसमध्ये चांगलं काम करत होते. योग्य उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या राजकारणातही निवडणून येऊ असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन आणि सत्याग्रह केला होता. इथल्या मतदारांनीही सांगितलं की कोण आलं होतं काय करत होते? हे सांगितलं आहे. भाजपाकडे असलेली ही जागा महाविकास आघाडीने खेचून आणली आहे. चिंचवडलाही हे घडलं असतं पण तिथे काही लोकांना तिकिटं हवी होती. राहुल कलाटेलाही मी थांबायला सांगितलं होतं. त्याचा फॉर्म निघू नये म्हणूनही प्रयत्न झाले. राज्यकर्त्यांनी कसबा असेल किंवा चिंचवड असेल दोन्हीकडे सगळे प्रयत्न पणाला लावले. पण पुण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. चिंचवडमध्ये सहानुभूतीचा मुद्दा होता. तसंच शिवसेनेचं जे चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं त्यामुळे मतदार चांगलेच चिडले होते. शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये ही चिड आम्हाला पाहण्यास मिळाली असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी पक्षाने सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या होत्या. वेगळ्या वेगळ्या युक्त्यांचा वापर केला. मात्र कसबा पेठेत त्यांना यश मिळालं नाही. रवींद्र धंगेकर यांना जिंकून देणाऱ्या सगळ्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. चिंचवडची मतमोजणी सुरू आहे. तिथेही आम्ही टफ फाईट देण्याचा प्रयत्न आम्ही केला. एक मेसेज गेला आहे राज्यात की तीन पक्ष एकत्र आले आणि नुसतं जागांचं वाटप नाही पण जनतेच्या मनातले उमेदवार ओळखून दिले तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल हेच या दोन पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं आहे. जेव्हा जनता एखादी गोष्ट ठरवते तेव्हा सहानुभूतीचाही विचार जनता करत नाही. कसबा पेठेत हे आपण पाहिलं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago