विटांची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने बाईकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघे जण ठार झाले आहेत, तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली. लहानग्याला दवाखान्यात नेत असताना काळाने घाला घातला. ही दुर्घटना काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव आंबेटाकळी रोडवर घडली.
बोरीअडगाव येथील हार्दिक रोहित वानखडे हा ४ वर्षीय मुलगा आजारी असल्याने गावातील जवान श्रीकांत अर्जुन सुरवाडे (वय २६ वर्ष) हा हार्दिकला दवाखान्यात नेत होता. त्याच्यासोबत हार्दिकची आई पूजा वानखडे (वय २६ वर्ष) व कल्पना शुद्धोधन सुरवाडे (वय ३४ वर्ष) या दोघी देखील होत्या. पल्सर बाईकने सर्व जण लाखनवाडा येथे जात होते.
दरम्यान बोरीअडगाव- आंबेटाकळी रोडवर त्यांच्या दुचाकीला विटांची वाहतूक करणान्या भरधाव वेगातील ट्रक (क्र. एमएच ०४ एफयु ९१७७) ने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चौघे गंभीररित्या जखमी झाले. यामुळे त्यांना प्रथम खामगाव व नंतर अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातातील गंभीर जखमी जवान श्रीकांत सुरवाडे, चार वर्षांचा चिमुकला हार्दिक रोहित वानखडे व कल्पना सुरवाडे या तिघांचा अकोला येथे मृत्यू झाला तर मुलाची आई पूजा वानखडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने बोरीअडगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…