ताज्याघडामोडी

आईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… सुन्न करणारी घटना

आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय ४८), प्राजक्ता जाधव (वय २२) आणि शितल जाधव (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा परसली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी देखील आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago