दहावीच्या विद्यार्थ्याचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराडमध्ये घडली आहे. शनिवारी दहावीचा निरोप समारंभ झाला आणि रविवारी राहुलने कायमचा निरोप घेतला. मंगळवारी सायंकाळी कोयना पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. राहुल परिहार असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल हा कराड आगाशिवनगरचा रहिवासी होता. तीन दिवसानंतर जुना कोयना नदीपात्रातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथे राहणारा राहुल गणेश परिहार हा मलकापूर कराडच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. राहुल रविवारी दुपारी कोयना नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना तो बुडाला. यावेळी नदीत पोहणाऱ्या इतर मुलांनी राहुल बुडत असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ त्याच्या घरी जाऊन राहुल बुडाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
यावेळी राहुलच्या कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेऊन राहुलचा शोध घेण्याचे काम सुरू केलं. अखेर मंगळवारी सायंकळी कोयना पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. राहुल परिहार हा नदीपात्रात बुडाल्याची घटना समजताच आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर आणि आगाशिवनगर परिसरात शोककळा पसरली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…