अचानक घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह गावातील एका शेतात हात तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून अपहरण करून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात घडली. सचिन प्रभाकर काळे असे मृत मुलाचे नाव आहे.
सचिन काळे दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याची गावातीलच एका मुलीसोबत मैत्री होती. तो नेहमी तिच्याशी बोलायचा. काही दिवसांपूर्वी सचिनने त्या मुलीला मोबाईल फोन गिफ्ट म्हणून दिला होता. याबद्दल तिच्या घरच्यांना समजले. दरम्यान सचिन २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सचिनचा सर्वत्र शोध सुरू असताना गावातीलच एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे दोन्ही हात मोडलेल्या अवस्थेत होते. यामुळे त्याला बेदम मारहाण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…