ताज्याघडामोडी

शिवसेना उपविभाग प्रमुख हत्या रवींद्र परदेशी यांची हत्या

रवींद्र परदेशी यांच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला. रूग्णालयात जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे स्टेशन रोडवर मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमागे पूर्व वैमनस्येचा हेतू असल्याचा संशय ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जे एन रणवरे यांनी व्यक्त केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रवींद्र परदेशी हे घरी परत जात होते. यावेळी दोघा जणांनी त्यांच्या डोक्यावर चॉपरने वार केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ला झाल्यानंतर परदेशी यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी परदेशी यांना मृत घोषित केले आहे. फेरीच्या धंद्यातून वाद होऊन रवींद्र परदेशी यांची हत्या झाली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाली होती, अशी माहिती मिळाली आहे.

रवींद्र मच्छिंद्र परदेशी यांची अज्ञात इसमाने चॉपरसारख्या धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली आहे. यात पक्षाचा संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आलेला नाही, तर वैयक्तिक कारणाने खून झाल्याचे दिसून येत आहे. फेरीवाल्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, अशी माहिती ठाण्यातील नगर पोली स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago