शेतकरी एकदा आपल्या शेतामध्ये काम करायला लागला की तो तहानभूक विसरुन काम करतो. आपल्या शेतात उगवलेल्या पीकाची लवकरात लवकर कापणी करुन ते बाजारात कसं नेता येईल, यासाठी बळीराजाची कायमच धावपळ सुरु असते. त्यासाठी सर्व गोष्टी विसरुन, भान हरपून शेतकरी शेतात काम करत असतात. मात्र, या नादात अनावधनाने घडलेली एखादी चूक अनर्थ घडवण्यास आणि जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकते. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी परिसरात घडला आहे.
शिंदी येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील एका चाळीस वर्षे महिलेचा पदर मळणी यंत्रात अडकल्याने त्या महिलेची जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव तारामती गुलाबराव बुंदे आहे . ही दुर्दैवी घटना २८ फेब्रुवारीला म्हणजे मंगळवारी दुपारी घडली . तांदुळ येथील गुलाबराव बुंधे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी रब्बी हंगामात हरभरा पेरणी केली होती. त्यांच्या शेतातील हरभरा सोंगून झाला होता. गावातीलच परस राम बुंधे यांचे मळणी यंत्र बोलावून हरभरा काढणीला सुरुवात केली होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने बुंदे यांच्या शेतात हरभरा झटपट काढण्यासाठी लगबग सुरु होती.
त्यासाठी गुलाबराव आणि तारामती दोघेही पती-पत्नी शेतातील हरभरा जमा करून मळणी यंत्रात आणून टाकत होते. यावेळी हवामान काहीसे ढगाळ होते, तसेच वाराही वेगाने वाहत होता. याचा अंदाज तारामती बुंदे यांना आला नाही. हरभरा मळणी यंत्रात टाकण्याच्या नादात त्यांना अंगावरील कपड्यांचे भान राहिले नाही. त्यामुळे तारामती यांच्या साडीचा पदर मळणी यंत्रात अडकला आणि त्या आतमध्ये ओढल्या गेल्या. त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना समजताच गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. हा अपघात असल्याने गावातच प्रकरण तंटामुक्त समिती सदस्यांनी मिटवून समझोता केला. मृतकाच्या मागे पती एक मुलगा दोन विवाहित मुली असा परिवार आहे या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतातील पिकांची कापणी सुरु असून हा माल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र, या गडबडीत मळणी यंत्रामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…