ताज्याघडामोडी

पत्नीने दिला धोका; बदला घेण्यासाठी ज्याच्यासोबत पळाली त्याच्या बायकोला…

प्रेमप्रकरणातून अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतात. पण, बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील प्रेमप्रकरणाची जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे पत्नीने आपल्या पतीला धोका दिला म्हणून पतीने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न केले ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.

खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न पसरहा गावात रुबी देवीसोबत २००९ मध्ये झाले होते. दोघांनाही चार मुलं होती. मात्र, रुबी देवीचे पसरहा गावात राहणाऱ्या मुकेशसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुकेशचंही लग्न झालेलं होतं. त्यालाही दोन मुलं होती. पण, या दोघांनी कसलाही विचार न करता फेब्रुवारी २०२२ मध्ये पळून जाऊन लग्न केलं. इतकंच नाही तर ते आपल्या दोन मुली आणि एका मुलाला सोबत घेऊन गावातून फरार झाले.

नीरजला त्याची पत्नी प्रियकर मुकेशसोबत पळून गेल्याचे समजताच नीरजने मुकेशविरुद्ध पसरहा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, अनेकवेळा गावात पंचायतही झाली पण मुकेश काही ऐकला नाही. मुकेश नीरजची बायको रुबीसोबत कधी या गावात तर कधी त्या गावात राहत होता. मग नीरजनेही बदला घेण्याचे ठरवलं. नीरजने आरोपी मुकेशच्या पत्नीसोबत पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांच्याही पत्नीचे नाव रुबी आहे.

मुकेशचा विवाह अमानी गावातील रुबी देवीसोबत झाला होता. मुकेश त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून नीरजच्या पत्नीसोबत राहत होता. मुकेशचा बदला घेण्यासाठी नीरज मुकेशची पत्नी रुबीला फोन केला. नीरजने तिला सांगितलं की आपल्या नवऱ्याला समजावं. या संदर्भात नीरज आणि मुकेशची पत्नी रुबी यांच्यात अनेकदा फोनवर संवाद होऊ लागला. संवादाचे प्रेमात रुपांतर कधी झाले हे नीरज किंवा मुकेशची पत्नी रुबीला कळाले नाही. दोघांनाही आधाराची गरज होती. अशा परिस्थितीत दोघांनी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी गावातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. या लग्नाची चर्चा आता अख्ख्या गावात होऊ लागली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

10 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

10 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago