एका बॉडिबिल्डरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. तरुण वयात मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार एका लोन प्रकरणात बँक आणि पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
दिल्लीतल्या गोकुलपूरी परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या 34 वर्षांच्या कपिल राज या तरुणाने 2019 मध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेतून 18 लाख 50 हजार रुपयांचं लोन घेतलं होतं. यापैकी त्याने 15 लाख रुपये चुकतेही केले. पण कपिलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने 21 लाख रुपयांचं व्याज लावलं होतं. आणि ते भरण्यासाठी बँकेने त्याच्यामागे तगादा लावला होता.
शुक्रवारी बँकेचे कर्मचारी कोर्टाचे आदेश घेऊन गोकुलपूरी पोलिसांबरोबर कपिलचा भाऊ अशोकच्या घरी पोहोचले. कपिल आणि त्याचा मोठा भाऊ अशोक यांचं घर आजूबाजूलाच आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कपिलचं घर समजून त्याचा भाऊ अशोकच्या घरी नोटीस चिटकवली. इतकंच नाही तर पोलिसांच्या मदतीने त्यांनी अशोकचं घर सीलही केलं.
बँक कर्मचारी आणि पोलिसांच्या त्रासाला कपिल राज कंटाळला होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबूक लाईव्ह केलं. लाईव्हमध्ये त्याने आपली व्यथा मांडली. 18 लाखांपैकी 15 लाख रुपये भरल्यानंतरही बँकेने 21 लाख रुपयांचा व्याज लावलं, व्याज चुकवण्यासाठी बँकेकडून सारखा तगादा लावला जातोय, माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय.
यात पोलिसही बँकेच्या बाजूने असल्याचं कपिल राजने आपल्या लाईव्हमध्ये सांगितलं. त्यामुळे आपल्या आत्महत्येला एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी जबाबदारी असल्याचं कपिलने आरोप केला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…