ताज्याघडामोडी

चिक्कू का तोडला? महिलेने हटकलं, तरुणाला खटकलं; घरात शिरून महिलेवर…

शहरातील सिडको परिसरात असलेल्या हनुमान चौक शॉपिंग सेंटर येथील एका घराच्या अंगणाबाहेरील चिकूच्या झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडास महिलेने हटकल्याने त्याने थेट घराचा सुरक्षा दरवाजा ओलांडून घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता या गावागुंडांची मजल अगदी छोट्या छोट्या कारणांवरून थेट घरात घुसून महिलांवर हल्ला कारण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गावगुंडांवर पोलिसांचा वचक उरला नसून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अंगणातील झाडावरून चिकू तोडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका संशयिताने हल्ला केला तर या महिलेने न घाबरता मोठ्या हिमतीने त्याचा विरोध केला. यावेळी आरडा ओरड झाल्याने शेजारील नागरिक जमा होऊ लागल्याने संशयित गावगुंडाने सदर महिलेस धमकावत तेथून पळ काढला.

असे असले तरी दुसरीकडे मात्र या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी या गावगुंडाची धास्ती घेतली आहे. तर पोलिसांनी सिडको भागात अशा गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त लावावा, अशी मागणी देखील येथील स्थानिक नागरिक करत आहे. दरम्यान, महिलेवर हल्ला झाल्याच्या घटनेने परिसरातील महिला वर्गाकडून परिसरात वावरत असताना भीती व्यक्त केली जात आहे. गल्ली बोळात चौका चौकात थांबलेल्या उपद्रवी टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago