मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका महिलेनं पतीवर वाईफ स्वॅपिंगचा आरोप केला आहे. पीडितेनं दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयानं मंजूर केली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पती त्याच्या बॉस आणि मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
मूळची इंदूरची असलेल्या पीडित महिलेचा विवाह पुण्यात राहणाऱ्या अमित छाब्रासोबत झाला. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अमित चुकीच्या मित्रांच्या संपर्कात आला. पत्नीनं बॉस आणि मित्रांसोबत संबंध ठेवावेत यासाठी तो तिच्यावर दबाव टाकू लागला. प्रमोशन आणि अधिक पैसे मिळवण्याच्या हेतूनं अमित पत्नीवर जबरदस्ती करू लागला.
अमितचा भाऊ राज याचीही पीडितेवर वाईट नजर होती. राज तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करू लागला. यामुळे पीडितेला मानसिक त्रास झाला. राजनं पीडितेच्या १२ वर्षांच्या लेकीसोबतही अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितेनं केला. याला विरोध करताच पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेनं एकदा हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सासरची माणसं तिला त्रास देत राहिली. लेकीसाठी पीडितेनं सुरुवातीला सगळं सहन केलं. मात्र सासरच्यांकडून होणारा त्रास वाढतच गेला.
१२ ऑगस्ट २०२२ रोजी पीडिता तिच्या माहेरी इंदूरला पोहोचली आणि गुपचूप राहू लागली. आई वडिलांनी खोदून खोदून विचारल्यानंतर तिनं तिची आपबिती सांगितली. यानंतर पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली. इंदूर पोलिसांनी अमितला पुण्याहून इंदूरला बोलावलं आणि त्याला समजावलं. यापुढे असं होता कामा नये, अशी ताकीद पोलिसांनी दिली.
यापुढे पत्नीला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, असं अमितनं पोलिसांसमोर लिहून दिलं. त्यानंतर पीडिता सासरी पसरली. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा सासरच्यांकडून तिच्यावर अत्याचार सुरू झाले. यानंतर पीडितेनं इंदूर जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयानं महिला बालविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी महिलेचा पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…