ताज्याघडामोडी

चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं

पिंपरी – चिंचवड पोलिसांनी कोणतेही कारण नसताना शनिवारी (२५ फेब्रुवारी) रात्री उद्धव ठाकरे गटाच्या सैनिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कार्यकर्त्यांना कोणताही गुन्हा नसताना दोन ते चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. निवडणुकीचे काम करता येऊ नये, यासाठीच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून आम्हाला डांबून ठेवल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि महविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या सहानभुती तसेच विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी विकास तसेच महापालिकेत सुरू असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने गेले काही दिवस प्रचारातही रंगत आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षांनी प्रचारात मोठा जोर लावला होता. भाजपने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांची फौजच तैनात केली होती. तर, राष्ट्रवादीने विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गताचे नेते आदित्य ठाकरे आदींसह प्रचार केला.

दरम्यान, प्रचाराची सांगता झाल्यानंतर शुक्रवारी रात्री कमळाची चित्रे असलेल्या स्लीप आणि काही लाखांची रक्कम वाटप करताना लोक काही कार्यकर्ते सापडले. या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर या कार्यकर्त्यांना ज्यांनी पकडून दिले त्यांनाही पोलिसांनी कोणतेही कारण नसताना पकडले. काही कार्यकर्त्यांना तर घरी जाऊन पकडले. त्यानंतर त्यांनां चिंचवड तसेच इतर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्त्यांना पकडल्याचे कळतं आहे.

निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे पोलिस यंत्रणा काम करते. आयोगाकडे तक्रार गेली असेल तर त्यानुसार पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर कारवाई केली असेल. नक्की काय प्रकार झाला आहे, याची माहिती घेण्यात येईल. तसेच पोलिस कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago