अजितदादांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहीत नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर येऊन दुसऱ्यांचं बारसं करू नये आणि माझ्या फंद्यात पडू नये, नाहीतर पुण्यात येऊन मी त्यांचे बारा वाजवेन’, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राहिलंय तरी काय?, राहिलेले १५-१६ आमदार देखील त्यांच्याकडे किती दिवस राहतील हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांना कोणतेही अस्तित्व नाही, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असंही नारायण राणे पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे जे चांगले प्रसंग आले ते केवळ तुझ्यामुळे आले आणि तुझा आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहू दे अशी प्रार्थना त्यांनी अंबाबाई चरणी केली. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन करून मंत्रीपदाची देखील ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे काही खासगी बोलणं झालं त्यामध्ये मला पडायचं नाही. काही जणांना सवय असते कायम तोंड घालण्याची. मात्र त्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते मला माहित नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच मी कोणताही ज्योतिषी नाही, कोणता पक्ष कधी संपणार आहे हे सांगायला काम जनता करते आणि ज्यांचं काम पोषक आहे त्या पक्षाला जनता निवडून देते आणि बाकीचे इतिहास जमा होतात, असे ते यावेळी म्हणाले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…