ताज्याघडामोडी

बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्रानेच कापला मित्राचा गळा

शहराजवळील मोहाडी गावाजवळील एका शेतात काल अज्ञात इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता, त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अगदी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत छडा लावला असून यात २१ वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

धुळे शहराजवळील मोहाडी परिसरात एका अज्ञात इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या खुनाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत छडा लावला असून या घटनेतील मयत सतीश बापू मिस्तरी (वय वर्ष २२) हा चेतन प्रताप गुजराती (वय वर्ष २१) याच्या बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून चेतन गुजराती याने सतीश मिस्तरी याचा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणी खुनातील मुख्य आरोपी चेतन प्रताप गुजराती या २१ वर्षीय आरोपीला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली असून याच खूनातील दुसरा संशयित आरोपी विधी संघर्ष बालक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीची छेड काढण्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केल्याच्या धक्कादायक घटनेचा छडा मोहाडी पोलिसांनी २४ तासांत लावला.

या घटनेतील मयत सतिश मिस्त्री याला आरोपी चेतन गुजराती याने दुपारी एक वाजेच्या सुमारास पार्टी करण्यासाठी बोलावून घेतलं. माझ्या बहिणीची छेड का काढतो, अशी विचारणा त्याने मयत सतिशला केली. त्यातून वादावादी होऊन आरोपीने रागाच्या भरात सतिशचा गळा चिरल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेनंतरही सतिशला कोणताही पश्चाताप होत नव्हता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago