खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोपांचा समाचार रामदास कदम यांनी घेतला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘सामना’चे सहसंपादक चिंदरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, मी संजय राऊत यांना तुमच्यावरती शाईफेक होईल म्हणून सांभाळून राहा असे सांगितले होते. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी मला मारण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप केला. हे संजय राऊत यांचे षडयंत्र आहे, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी कदमांनी संजय राऊत यांच्यावर बरीच आगपाखड केली.संजय राऊत आता तुम्ही थांबा आता मला जास्त बोलायला लावू नका. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. संजय राऊत यांना मी आता एवढेच सांगेन की, मी काही गोष्टी अजूनही विसरलेलो नाही. तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय अश्लील शिवीगाळ केली होती, याची आठवण मला आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
ज्या वेळेला सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी रश्मी वहिनींना दिली, त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरली होती. हे मी विसरलेलो नाही. संजय राऊत आमदारांचे भाव तुम्हीच ठरवताय तुम्हीच बोलताय. हे थांबवा मला तोंड जास्त उघडायला लावू नका, असा इशारा रामदास कदम यांनी दिला. मी इतके दिवस गप्प होतो पण आता डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे. त्यामुळे आता आपण थांबणार नाही. संजय राऊत यांनी आता ‘बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावे’, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
संजय राऊत हे उसने अवसान आणून शिवसेना वाचवतो आहोत, असा अविर्भाव आणत आहेत. पण तुमच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. तुम्ही सबंध देशाला व महाराष्ट्राला फसवत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तोच कडवेपणा तुम्ही दाखवत आहात. संजय राऊत कुणाकडून सुपारी घेऊन बोलत आहेत, हे मी सगळच बोलणार आहे पण अजून थोडे दिवस मी थांबतोय, असे रामदास कदम यांनी म्हटले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…