मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. या पोस्टरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. आता या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मुंबई पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्याचा शोध घेत आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ‘हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पोस्टरबाबत पत्रकारांकडून यासंबंधी माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने, व्यक्तिने लावले आहे का याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी. माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? असा प्रतिप्रश्न सुळे यांनी केला.
‘विरोधी पक्षनेते अजित पवार व माझे फोटो असलेले पोस्टर यापूर्वी लावण्यात आले होते. यामुळे अजितदादाचा आणि माझे फोटो कोण लावतंय, त्याच्या मागे कोण आहे? हे फोटो पहाटेच का लावले जात आहेत. कुठल्या पोलिसांनी त्याचा फोटो काढला. कुठे लावला गेला फोटो. याची चौकशी झाली पाहिजे. त्यातून आमचे खासगी आयुष्य, सुरक्षितता याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हा राजकीय विषय नाही. पण याचा पोलिसांनी गांभिर्याने विचार करत संबंधिताचा शोध घ्यावा. मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…