ताज्याघडामोडी

नादुरुस्त बॉयलर बेल्ट अचानक सुरु, कामगार आत ओढला गेला, पट्ट्यात अडकून जीव गमावला

बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यात घडली. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती मिळताच कारखान्यातील इतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

घटनेविषयी अधिक माहिती अशी, की कल्याण गणपती टोले (वय वर्ष ४०) हा आनंदगाव येथील रहिवासी होता. डोले तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखाना म्हणजेच शुगर इंडस्ट्रीमध्ये तो काम करत होता.

गेल्या काही दिवसांपासून कारखान्यातील काही मशिनरींची दुरुस्ती सुरु होती. नादुरुस्त मशिनरी व्यवस्थित करण्यासाठी रात्रीच्या वेळेला हे काम चालू होतं. मात्र रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कल्याण टोले हा बॉयलर जवळ काम करत होता. यावेळेस अचानक मशीनचा पट्टा चालू झाल्याने कल्याण या मशिनच्या पट्ट्याकडे ओढला गेला. या पट्ट्यात अडकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटना आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना कळतात मशीन तात्काळ बंद करण्यात आली. त्यानंतर कल्याणला येथील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ फोन करून या घटनेची माहिती सांगितली, मात्र या घटनेने कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago