ताज्याघडामोडी

ठाकरे समर्थनाची ती शेवटची पोस्ट टाकून तो कायमचे जग सोडून गेला, कट्टर समर्थकाच्या अकाली एक्झिटने हळहळ

‘ठाकरेच आमचा पक्ष आणि ठाकरेच आमचे चिन्ह…’, अशी पोस्ट करून कट्टर ठाकरे समर्थक रात्री झोपला. ती त्याची शेवटचीच पोस्ट ठरली. त्याच्या पोस्टला लाईक मिळत असतानाच भल्या सकाळी तो हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने गेल्याची बातमी कळली आणि सारेच हळहळले. प्रवीण दत्तात्रेय अनभुले (वय ३२) या अहमदनगरमधील तरुणाच्या निधनाने त्याचे प्रत्यक्षातील आणि सोशल मीडियातील मित्र हळहळ व्यक्त करीत आहेत.

प्रवीण दत्तात्रेय अनभुले मुळचा कर्जत तालुक्यातील घुमरी या गावाचा. नोकरीनिमित्त अहमदनगर शहरात राहतो. अलीकडेच त्याचा विवाह झाला आहे. आई, पत्नी आणि भाऊ असे त्याचे कुटुंब. गावाकडे शेती आहे. अहमदनगरमध्ये राहून एका कंपनीचा सोलापूर विभागाच्या मार्केटिंग व्यवस्थापनाचे तो काम करीत होता. प्रत्यक्ष प्रवास आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दांडगा जनसंसपर्क झालेला. त्यामुळे त्याला सोशल मीडियात आणि प्रत्यक्षातही लाइक करणारा मोठा वर्ग आहे. उध्दव ठाकरे यांचा कट्टर समर्थक असला तरी सर्वच पक्षांत त्याचे मित्र. पक्षासोबतच इतर सामाजिक कार्यायतही तो हिरीरीने सहभाग व्हायचा.

ठाकरे- शिंदे वादावर निवडणूक आयोगाचा अलीकडेच निर्णय आला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आयोगाने शिंदे यांना दिले आहे. त्यावरून राज्यभरात ठाकरे समर्थकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुभुले यांनीही यावर भाष्य केले. ठाकरे यांना पाठिंबा आणि निष्ठा व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी लिहिली. त्याच मजकुराचा डीपीही ठेवला. त्यावर प्रतिक्रिया येत होत्या.

हे सुरू असतानाच आज सकाळी त्यांना अचानक त्रास सुरू झाला. छातीत वेदना आणि उलट्याही झाल्या. त्यामुळे पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. ही बातमी कळताच त्यांच्या मित्रांनी हळहळ व्यक्त केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago