मासे विक्री करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डिंगणी परिसरात हा प्रकार घडला होता. अखेर हत्या प्रकरणी २३ वर्षीय युवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी जयेश रमेश गमरे यानेच पैशांसाठी खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अत्यंत दुर्गम व जंगलमय भागात हा खून केल्यानंतर कोणतेच पुरावे नसल्याने खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान रत्नागिरी पोलिसांसमोर होते. मात्र जंगल परिसराजवळ असलेल्या गावांमध्ये माहिती मिळवून, संशयित तरुणावर पाळत ठेवून मोबाईलमधील तांत्रिक लोकेशनच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित नराधम तरुणाने दगडाने ठेचून महिलेचा खून करत पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी पिरंदवणे, संगमेश्वर येथील जंगलमय पायवाटेवरून विविध वाड्या व गावांमध्ये किरकोळ मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारी ५० वर्षीय महिला सईदा रिझवान सय्यद, रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हिला एका अज्ञात इसमाने मारहाण व डोक्याला गंभीर इजा करून तिला जीवे मारले होते. तिची शोधाशोध सुरू असताना जंगलामध्ये काही अंतरावर मच्छीची टोपली व तिथेच काही अंतरावर तिचा मृतदेह मिळाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणाने तिचा मृतदेह जंगलात फेकला होता. प्रथम दर्शनी पोलिसांना हा खून असल्याचा संशय आला होता, त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे हाती घेत तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. या परिसराची पाहणी करताना हा भाग अत्यंत दुर्गम व जंगलमय असल्याने हा खून करणारा याच परिसरातील व्यक्ती असावा याचा अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आला होता. यावेळी त्यांनी तातडीने या तपासाकरता पोलिसांचे पथक नियुक्त केलं होतं. संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले.
त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा व स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी व संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला
काही दिवसांच्या आतच म्हणजे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे पिरंदवणे बौद्धवाडी येथे राहणारा २३ वर्षीय संशयित युवक जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज हेमंतकुमार शहर पोलीस निरीक्षक, उदय झावरे, पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे संशयित जयेश गमरे याला न्यायालयाने २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…