उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते चुकून राजकारणात आहे. त्यांचीच माणसं मला येऊन सांगायची की उद्धव ठाकरे हे शकुनीच्या नादाला लागले आहेत. आता हा शकुनी कोण आहे हे तुम्ही शोधा, असे वक्तव्य माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते सरळमार्गाने चालणारे आहेत. ते शकुनीच्या चक्रात अडकले आहेत, असे त्यांचीच माणसे मला येऊन सांगायची. ते शरद पवार यांच्यासारखे तरबेज राजकारणी नाहीत. विधानपरिषदेच्या आमदारांची नियुक्ती करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात मला थेट धमकी देण्यात आली होती. तुम्ही पंधरा दिवसांत निर्णय घ्या, असे त्या पत्रात नमूद केले होते. अशाप्रकारे राज्यपाल यांना धमकी दिली जाऊ शकते का?, असा प्रश्नही कोश्यारी उपस्थित केला.
आदित्य ठाकरेवर मुलाप्रमाणे प्रेम करतो. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा प्रस्ताव आदित्य घेऊन आला होता. तो सारखा फोन करायचा. मी त्याला विचारलं अरे तुमचा नवरदेव कुठे आहे. त्याला आधी आणा. उद्या त्याने मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर. तरीही उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. मी त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना सांगितले की हे चुकीचे आहे. उद्धव यांनी पुढे यायला हवे. पटलेही बोलले हे चुकीचेच आहे. विचारा छगन भुजबळ व अन्य नेत्यांना हे सत्य आहे की नाही. तीन तासांनी उद्धव ठाकरे समोर आले. यावर कोणीच काही बोलत नाही, असे कोश्यारी यांनी सांगितले.
कोरोनात काळात मंदिरे उघडण्याबाबत कोश्यारी यांनी राज्य शासनाला पत्र लिहिले होते. हिंदुत्त्व विसरलात का?, असा सवाल त्या पत्रात करण्यात आला होता. हे पत्र कोणाच्या दबवाखाली लिहिण्यात आले होते का?, असा प्रश्न कोश्यारी यांना विचारण्यात आला. त्यावर कोश्यारी म्हणाले, मी कोणाच्याही दबावाखाली ते पत्र लिहिले नव्हते.
महाविकास आघाडीने विधानपरिषद आमदारांची नियुक्ती करा, असे पत्र मला देण्यात आले. त्यात १५ दिवसांत निर्णय घ्या, असे लिहिले होते. अशाप्रकारे कोणी पत्र लिहितं का. तुम्ही विनंती करायला हवी. मला निर्णय घेण्यासाठी मुदत कशी दिली जाऊ शकते. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही चुकीची होती. मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्यावर नाही. तेव्हाही मला धमकी देणारे पत्र लिहिण्यात आले. नवीन सरकार आले तेव्हा त्यांनी व्यवस्थित पत्र दिले. म्हणूनच नवीन अध्यक्षांची निवड तत्काळ केली, असा खुलासा कोश्यारी यांनी केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…