सिंगिंग अॅपवर मैत्री झालेल्या मुस्लिम तरुणाने लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अश्लील संवाद साधल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर नंतर तो महिलेच्या घरी पोहोचला, तिथे त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, तर अल्पवयीन मुलासोबतही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपी तरुणाने मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे.
पीडित लष्करी अधिकाऱ्याचे कुटुंब उत्तराखंडमधील डेहराडून कॅन्ट परिसरात राहत, तर आरोपी तरुण हा बिहारचा रहिवासी आहे. पीडितेला १५ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांचा मुलगा आहे.
पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने एका तरुणाला घरी बोलावले होते. या युवकाने त्यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचे धर्मांतर करण्यास भाग पाडले. त्यासोबतच मुलासोबतही अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले.
बिहारमधील इस्लाम कॉलनी येथील रहिवासी तनवीर आलम याच्याशी आपल्या पत्नीची एका सिंगिंग अॅपद्वारे भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी तक्रारदार अधिकारी एका कोर्ससाठी महाराष्ट्रात गेला होता. यावेळी पत्नीने तनवीरला घरी बोलावले. मुलीनेच याबाबत त्याला फोनवरून माहिती दिली, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
मुलीने तनवीरला महिलेसोबत अनेक वेळा अश्लील कृत्य करताना पाहिले आहे. यानंतर तन्वीरने संबंधित अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्याचा आरोप आहे. तन्वीरने आपल्या मुलासोबतही अश्लील कृत्य केल्याचा आरोप अधिकाऱ्याने केला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…