ताज्याघडामोडी

ठाकरे गटाचे मशाल चिन्हही येणार धोक्यात?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. १७) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे.

ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आलेले मशाल चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी समता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आज (शनिवार) सकाळी 10 वाजता समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगानं अंतिम निकाल येईलपर्यंत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.

पण, यानंतर शुक्रवारी (ता. १७) निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल याच चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केला आहे. आज सकाळी दहा वाजता याच पार्श्वभूमीवर समता पक्षाचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago