घरी कुणालाही काही एक न सांगता निघालेल्या तरुणाचा शेतातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात ही घटना उघडकीस आली आहे. आवेद गबु तडवी (वय २५ वर्ष, रा. न्यू व्यास नगर, यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. मोबाईलवरुन मित्राला फोन केला, आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत अन् काही क्षणात आवेश याने विहिरीत उडी घेवून जीवन संपविले असावे अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
जळगावात यावल शहरातील विस्तारित भागात न्यू व्यास नगर आहे. चोपडा तालुक्यातील बिडगाव मोहरद या गावातील मूळ रहिवासी असलेला आवेद गबु तडवी हा गेल्या काही वर्षापासून यावल शहरातील न्यू व्यास नगरात कुटुंबासह वास्तव्यास होता. तो त्याच्या एम. एच. १९ ए. एल. १४८५ या क्रमाकांच्या दुचाकीने बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरात कुणाला काही एक न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो बेपत्ता झाला.
याच दरम्यान त्याचा शोध घेताना यावल सातोद रस्त्यावर सुनील भोईटे याच्या शेतात एका खोल विहिरीजवळ आवेद याची दुचाकी तसेच त्याची चप्पल आढळून आली. त्यामुळे त्याने शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बाऱ्हे, किशोर परदेशी, संजय देवरे, अनिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली व दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…