एका १९ वर्षीय तरुणानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. मूळचा अलिगढचा रहिवासी असलेला तरुण नोएडात राहून लष्कर भरतीची तयारी करत होता. अग्नीवीर म्हणून लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्यात त्याला अपयश आलं. यामुळे त्यानं टोकाचा निर्णय घेतला आणि आयुष्याला पूर्णविराम दिला. गळफास लावून त्यानं जीवन प्रवास थांबवला.
अग्नीवीर भरती प्रक्रियेत अपयश आल्यानं दीपूनं टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांना त्याच्या जवळ एक चिठ्ठी सापडली. ‘भावा, मी सैनिक होऊ शकलो नाही. पण तू नक्की सैनिका हो. मी तुला वरून बघेन. आई, वडिलांची काळजी घे,’ असं दीपूनं चिठ्ठीत म्हटलं आहे. मूळचा अलिगढचा असलेला दीपू त्याचा लहान भाऊ अमन आणि आत्येभाऊ अंशूसोबत बरौला गावात भाड्यानं राहायचा. पोलिसांनी दीपूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
दीपूचे वडील हरीसिंह अलिगढमध्ये असतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वडिलांना आधार देण्यासाठी दीपूनं लष्कर भरतीची तयारी सुरू केली. दीपू अनेक वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्नशील होता. दीपूनं अग्नीवीरसाठी परीक्षा दिली. मात्र त्याच्या पदरी अपयश आलं. त्यामुळे तो खचला आणि त्यानं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. दीपू गेले अनेक दिवस तणावाखाली होता.
सोमवारी दुपारी अंशू आणि अमन घराबाहेर गेले होते. त्यावेळी दीपूनं दार लावून घेतलं आणि टोकाचं पाऊल उचललं. ‘अमन, मला सैनिक व्हायचं होतं. पण तसं होऊ शकलं नाही. तू मेहनत करून जरुर सैन्यात भरती हो. परीक्षेचा निकाल आल्यापासून मला झोप लागली नाही. मी मानसिकदृष्ट्या त्रासलो आहे. तू आई, वडिलांची काळजी घे. मी वरुन तुला सैनिक होताना पाहीन. मला आनंद होईल,’ अशा शब्दांत दीपूनं त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली.
या जन्मात सैनिक होऊ शकलो नाही. पण पुढल्या जन्मी नक्की होईन. चार वर्षे मेहनत केली. पण काहीच झालं नाही. मी आई वडिलांसाठी काहीच करू शकलो नाही. त्यामुळे आयुष्य संपवतोय, असं दीपूनं चिठ्ठीत लिहिलं आहे. ‘बरौला गावात एका तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…