हरियाणातील नूह जिल्ह्यातील सीलखो गावात एका महिलेने घरातून २ लाख रुपये रोख आणि सुमारे दीड लाखांचे दागिने घेऊन प्रियकरासह पळ काढला. आपली पत्नी ज्या व्यक्तीसोबत पळून गेली होती ती व्यक्ती आपल्या पत्नीचा काका आहे असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
साहून येथील रहिवासी असलेल्या या पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडित पतीचे झिमरावत फकिराबस येथील रहिवासी असलेल्या मुस्कान हिच्यासोबत ४ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीला धक्का बसेल असे गुपित पीडित पतीला कळले. लग्नानंतर काही कालावधीनंतर झिमरावत येथील सद्दाम याच्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू असल्याचे निष्पन्न झाले. सद्दाम हा दुसरा तिसरा कोणी नसून तो मुस्कान हिचा काका आहे. हे पाहून पीडित पतीला धक्का बसला.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या १ महिन्यानंतर प्रियकर सद्दाम पत्नीला भेटायला आला. त्यावेळी त्याला सेलखो गावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर पंचायत स्तरावर घेतलेल्या निर्णयात त्यांना गावात परत येणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले. गावबंदी झाल्यानंतरही सद्दामने आपले कृत्य सोडले नाही आणि गेल्या रविवारी रात्री पत्नीला फूस लावून पळवून नेले, असा पीडित पतीचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेत सद्दामच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला आहे, असाही पीडित पतीचा आरोप आहे.
आपल्या काकासोबत पळून गेलेल्या या महिलेने घरातून दोन लाख रुपयांची रोकडही सोबत नेली. इतकेच नाही तर, दीड लाख रुपयांचे दागिने आणि मोबाइल फोन देखील ती घेऊन गेल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. सद्दाम व्यतिरिक्त हसम, मुबीना, दिनू आणि टपकन रहिवासी मुस्ताक यांचाही त्याच्या पत्नीला पळवून नेण्यात हात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…