२५ वर्षीय मैत्रिणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अमेय दरेकर याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून पोलिसांनी अमेयची आई राधिका दरेकर यांचे नाव वगळले आहे. मालाडमधील बीपीओची कर्मचारी असलेल्या प्रियांगी सिंगला १२ नोव्हेंबर रोजी अमेयने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर प्रियांगीने मात्र आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं आठवत नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, पुढील तपासात गुन्ह्यात अमेयच्या आईची गुन्ह्यात भूमिका उघड झाल्यास राधिका दरेकर यांचे नाव पुरवणी आरोपपत्रात दिले जाईल, असे दहिसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले. राधिका दरेकर यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
१२ नोव्हेंबर २०२२ रोजी दहिसरमधील टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर मद्यपान केल्यानंतर आपला प्रियांगीसोबत वाद झाला. दारुच्या नशेत ओव्हरहेड टँकवरुन आपण तिला खाली ढकलले, अशी कबुली अमेयने दिल्याचा उल्लेख दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल आरोपपत्रात आहे.पोलिसांनी आरोपपत्रात ४० साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश केला आहे. याशिवाय दारुच्या बाटल्या, कपडे आणि रक्ताचे नमुनेही पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.पाण्याच्या टाकीवरुन खाली पडल्यानंतर प्रियांगीला झालेल्या जखमांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गेल्या आठवड्यात तिचा जबाब नोंदवला असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुरवणी जबाब नोंदवला जाईल, असे आरोपपत्रात म्हटले आहे.\
अमेयचा मित्र दहिसरमधील एका टोलेजंग इमारतीत राहतो. १२ नोव्हेंबर रोजी या इमारतीच्या गच्चीवर अमेय आणि प्रियांगी यांनी एकत्र रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमेय प्रियांगीला बोरिवलीमधील स्वतःच्या घरी घेऊन आला. त्यानंतर अमेयच्या आईने तिला दिंडोशीमधील तिच्या राहत्या घरी सोडले. त्यावेळी ती बेुद्धावस्थेत होती, तर तिचे कपडेही भिजलेले होते. कामवालीकडे प्रियांगीला सुपूर्द करताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा अमेयच्या आई राधिका दरेकर यांनी केला होता.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…