तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे.
केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे.राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या सेवेतील १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नव्या या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. दरम्यान महासंघाने परिपत्रक काढून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने वेतन श्रेणीतील तफावतीसंदर्भात एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहे. त्यामुळे आता १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.दरम्यान केंद्र सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग लागू करण्यात येणार होता. मात्र त्यात काही त्रुटी होत्या. आता नव्या शासन निर्णयात या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…