दारुचं व्यसन हे अत्यंत घातक असतं हे सर्वांनाच माहिती आहे. तरीही अनेकांना दारुचं व्यसन जडलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा दारुमुळे अनोकांना आपला जीव गमवावा लागतो. याची अनेक उदाहरण आपण पाहिली असेल. उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही असंच काहीसं झालं आहे. जिथे, दारुमुळे एका व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये दारु पिण्यावरुन लावलेल्या पैजमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या व्यक्तीने त्याच्या दोन मित्रांसोबत १० मिनिटांत तीन क्वार्टर दारू प्यायची अशी पैज लावली होती. त्याने ती अट मान्य केली आणि एकानंतर एक तीन क्वार्टर दारू प्यायली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला.
ही धक्कादायक घटना आग्रा येथील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पग्राममधील आहे. रविवारी सायंकाळी उशिराच्या सुमारास डौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा जयसिंग त्याचे मित्र भोला आणि केशवसह शिल्पग्राम येथील पार्किंगमध्ये पोहोचला. त्याच वेळी या तिघांमध्ये १० मिनिटांत ३ क्वार्टर दारू प्यायची पैज लागली.
जयसिंगने १० मिनिटांत ३ क्वार्टर दारू पिऊन पैज जिंकली. पण, त्यानंतर त्याची तब्येत इतकी बिघडली की तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून त्याच्या नातेवाईकांनी भोला आणि केशवविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…