ताज्याघडामोडी

दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा स्लॅब कोसळला; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली. घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या तरुणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. 

मुंबई अग्निशमन दलाला सकाळी ९.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. ही माहिती मिळाताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. भांडुप पश्चिमेला असलेल्या खिंडीपाडामध्ये ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. स्लॅबचा काही भाग दोन तरुणांवर कोसळला, अशी माहिती आहे. राजकुमार राम सहाय (वय २१) आणि रामावतार अर्जुन यादव (वय १८) हे दोन तरुण घटनेत गंभीर जखमी झाले. या जखमींना जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात नेले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मुंबी महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात भांडुप पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago