ताज्याघडामोडी

लेकीला नवऱ्याकडून त्रास, आई पोलिसांत; जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला

कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हा वाद मिटल्याचे भासवत जावयाने सासूवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा थरार पोलीस स्टेशनमध्येच रंगला. मात्र, दक्ष पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पण पोलीस स्टेशनमध्येच सासूवर जावयाने केलेल्या हल्ल्याची शहरभर चर्चा सुरु आहे.

या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, महादेव नगर मांजरी) या जखमी झाल्या आहेत. तर आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानंतर मंगेश महादा तारे (२९, वडगाव शेरी) या जावयाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य राहतं. मात्र, या दोघांमध्ये सतत वाद होत होते. पती मंगेश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या पती मंगेश याची तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आल्या. पण “आता आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाही”, असं मंगेश सांगत होता. असं सांगत मंगेश सासूच्या पाया पडू लागला आणि त्याने जॅकेटच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढत सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला.

काही समजण्याच्या आतच हा धक्कादायक प्रकार घडला. तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी मंगेशला रोखले व त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी आणि दाखवलेल्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. “कौटुंबिक वाद मिटवल्याचे नाटक करत जावयाने सासूवर लपवून आणलेल्या चाकूने काही कळण्याच्या आत वार केला”. पण आमच्या पोलीस उपनिरक्षकाच्या दक्षतेमुळे पुन्हा हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ताब्यात घेतलं”, असं हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago