ताज्याघडामोडी

आई आणि आजीसोबत ती रुग्णालयात गेली, रिपोर्ट पाहून सर्वाना धक्का बसला; चुलत भावाने केलं नको ते कृत्य

चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे. पण तरीही तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला म्हटले. मात्र, तिने नकार दिला. परंतु, त्याच क्षणापासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवर बोलचाल सुरू झाली.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला तू मला खूप आवडतेस, असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्याने तिला धमकीही दिली. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तेथून सलग ८ दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहित पडल्यास कुटुंबातील सदस्य मारतील. या भीतीने तिने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

६ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना स्वतःत काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. यावेळी पीडित १५ वर्षीय मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिने याबाबत आपल्या आई व आजीला माहिती दिली. त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली. त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सूचविण्यात आले. त्यानुसार पीडितेने आईसह कोतवाली ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago