पांडुरंग साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्या -संचालक लक्ष्मण धनवडे
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून वसंतदादा शुगर इन्स्टिटूयट सह विविध कृषी संशोधकांकडून करण्यात येणारे नित्य नवे संशोधन,ऊस व्यवस्थापन यांची माहिती ऊस उप्तादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस विकास चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.नारायण चिंचोली येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात बोलताना ऊस उत्पादकांनी कारखान्याकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ;पांडुरंग’चे संचालक लक्ष्मण धवनडे यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी परिपूर्ण माहिती देत कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक व सर्व संचालक मंडळाने निडवा ऊस पिकास १०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्याची माहिती दिली.ऊस रोपे ५० टक्के अनुदान योजना,सुपंत जिवाणू खते,कंपोष्ट खते,माती परीक्षण,तसेच खोडवा गेल्यानंतर तासणी करणे आदींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शिवाजीराव गुंड,उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण,धर्मराज नलवडे,चेअरमन ज्ञानेश्वर बरडे,विष्णू माने,हनुमंत देशमुख,पोपट पाटील,बळवंत धनवडे,कारखान्याचे ओव्हरसियर,राहुल नागणे,सुरज घाडगे,भीमराव घाडगे,बाळासो आर्किले,परमेश्वर डुबल,विशाल चव्हाण यांच्यासह पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सभासद,ऊसउत्पादक उपस्थित होते.
👉A TATA Product
👉टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
👉डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
👉संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
👉सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
👉बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*
आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…