ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध

जिल्हा नियोजन समितीकडे आ.आवताडेंचा पाठपुरावा 

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई – सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार आवताडे यांनी आज दिली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सभागृह अंतर्गत विशेष सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. सदर निवडीनंतर आरोग्यासारख्या अतिशय गरजेच्या आणि महत्त्वपूर्ण सेवाक्षेत्राच्या भौतिक गरजांच्या बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी मी माझ्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्रव्यवहार केला करुन सदर मागण्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या या निधीमुळे विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रांचे व उपकेंद्राचे रूप बदलण्यास फार मोठी मदत होणार असून, यापुढील काळामध्येसुद्धा अशा प्रकारच्या भरीव निधीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.
*पंढरपूर मधील निधी मंजूर गावे व कामे -*
गादेगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे तसेच पोस्टमार्टम रूम व ओ. टी रूम दुरुस्ती करणे १५ लाख रुपये, मुंडेवाडी येथील आरोग्य केंद्रामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे व इतर सोयी – सुविधा करणे १० लाख रुपये, गोपाळपूर येथील उपकेंद्र दुरुस्ती ३ लाख रुपये, खर्डी येथील उपकेंद्र शौचालय दुरुस्ती आणि पाणीपुरवठा करणे ३ लाख रुपये, लक्ष्मी टाकळी येथील उपकेंद्र दुरुस्ती व पाणीपुरवठा करणे ३ लाख, वाखरी येथील आरोग्य उपकेंद्र पाणीपुरवठा करणे ३ लाख, शेटफळ(तपकीरी) येथील उपकेंद्र दुरुस्ती करणे ३ लाख, अनवली येथील उपकेंद्रला संरक्षण भिंत बांधणे ७ लाख रुपये, भाळवणी येथील उपकेंद्र दुरुस्ती ३ लाख रुपये.
*मंगळवेढा निधी मंजूर गावे व कामे*
आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज अशी पोस्टमार्टम रूम बांधणे व ड्रेनेज दुरुस्ती आणि छत गळती दुरुस्ती करणे ७ लाख रुपये, भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्टमार्टम रूम बांधणे व कर्मचारी निवासस्थान इमारत मधील ड्रेनेज दुरुस्ती ७ लाख रुपये, मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्टमार्टम रूम बांधणे व कर्मचारी निवासस्थान दुरुस्त करणे ७ लाख रुपये, लक्ष्मी दहिवडी येथील उपकेंद्र दुरुस्त करणे २ लाख ५० हजार रुपये, घरनिक्की येथील उपकेंद्र दुरुस्ती करणे ५ लाख रुपये, पाठखळ येथील उपकेंद्राला संरक्षक भिंत बांधणे २ लाख ५० हजार रुपये, कागष्ट येथील उपकेंद्र दुरुस्ती व विद्युतीकरण करणे ३ लाख रुपये, लवंगी येथील उपकेंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ३ लाख रुपये, डोणज येथील उपकेंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉग बसवणे व नवीन ड्रेनेज करणे ३ लाख, निंबोणी येथील उपकेंद्र इमारत दुरुस्ती ३ लाख.

👉A TATA Product
👉टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
👉डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
👉संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
👉सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
👉बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago