उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक नवरदेव फेशियल करायच्या बहाण्यानं फरार झाला. त्यामुळे कुटुंबाला नाचक्की सहन करावी लागली. अखेर नवरदेवाचा लहान भाऊ नवरीसोबत लग्न करेल, असा तोडगा काढण्यात आला. हा तोडगा मुलीकडच्यांनी मान्य केला. त्यामुळे अखेर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लहान भावानं लग्न केल्यानंतर त्याचा मोठा भाऊ घरी परतला आहे. फेशियलच्या बहाण्यानं पळून गेलेला मोठा भाऊ अखेर माघारी आला आहे.
बिलसंडातील मोहम्मदपूर गावात वास्तव्यास असलेल्या मावत तिवारी यांचा मोठा मुलगा शशांकचं लग्न बरेलीतील तरुणीशी ठरलं होतं. १ फेब्रुवारीला वरात निघणार होती. मात्र त्याआधी शशांक फेशियलसाठी पार्लरला गेला. तो बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत होतं. शशांकला बराच वेळ शोधूनही त्याचा ठावठिकाणा सापडला नाही.
शशांकच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. शशांकचा लहान भाऊ विषर्भ लग्नाला तयार असल्याचं सांगण्यात आलं. सुदैवानं मुलीच्या कुटुंबीयांना आक्षेप नव्हता. शशांक अचानक पळून गेल्यानं विषर्भला होणाऱ्या वहिनीसोबत लग्न करावं लागलं. दरम्यान शशांकचं कुटुंब आणि पोलीस शशांकचा शोध घेत होते. पोलिसांनी शशांकच्या फोनचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला.
शशांक एका तरुणीशी सातत्यानं संपर्क साधत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तिनं काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र कसून चौकशी करता तिनं शशांकसोबत कोर्ट मॅरेज केल्याचं सांगितलं. त्यानंतर तिनं काही कागदपत्रं पोलिसांना दाखवली. यानंतर शशांकच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. ‘आम्ही मोठ्या मुलासोबतचे संबंध तोडले आहेत. त्यानं लग्न केलं. तो आता सज्ञान आहे. त्याला वाटेल ते तो करू शकतो,’ असं शशांकचे वडील म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…