ताज्याघडामोडी

पंढरपूर एम.आय.डी.सी.च्या कामास गती द्या,उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

आ.आवताडेंच्या उपस्थितीत पार पडली अधिकाऱ्यांची बैठक   

पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता. सदर एम. आय. डी. सी. साकार झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील निरनिराळ्या विकासात्मक बाबींचा विकास कसा होऊ शकतो यावर फक्त कागदी घोडे नाचवून या मुद्द्याला वारंवार उर्जित ठेवण्याचा प्रयत्न सतत केला जात होता. परंतु विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मंगळवेढा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांनी जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी बाबींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आपले राजकीय कौशल्य पणासलावून आत्तापर्यंतचा सर्वात भरीव आणि मोठा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे. आमदार आवताडे यांची ही विकासाभिमुख दृष्टी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. आ. आवताडे यांच्या या मागणीला सक्षमपणे पुष्टी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाची गती वाढविण्याचे निर्देश उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री ना. नंबर उदय सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक संपन्न झाली. त्यावेळी संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील एम.आय.डी. सी या व्यावसायिक संकुलास व्यापक व विस्तारित रूप देण्यासाठी उद्योजकांना या एम. आय. डी.सी मध्ये छोटे – मोठे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. जे उद्योजक मंगळवेढा येथील एम.आय.डी.सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दर्शवतील अशा उद्योजकांच्या समस्या व अडी- अडचणी प्राधान्य क्रमाने सोडविण्यावरही यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये या व्यवसायिक हबमुळे अर्थकारणास मोठी संजीवनी मिळणार असल्याचेही या बैठकीत मत मांडण्यात आले.

मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींच्या धोरणात्मक प्रगतीचा रथ पुढे संक्रमित करत असताना आमदार आवताडे यांनी पंढरपूर एम. आय. डी. सी पूर्णत्वास जाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चंग बांधला आहे. अशातच राज्यामध्ये सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर आमदार आवताडे यांच्या या मागणीला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीस आणखी धार प्राप्त झाली. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्र तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदर एम. आय. डी. सी. साकार होणे ही काळाची गरज असल्यामुळे आमदार आवताडे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून या प्रश्नाच्या अनुषंगाने पाठपुरावा केला होता. येथील स्थानिक बेरोजगारी व आमदार आवताडे यांची या मागणीबद्दल असणारी तळमळ लक्षात घेऊन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या सह्याद्री शासकीय निवासस्थानी आमदार आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन या प्रश्नावर सखोल चर्चा केली.

सदर बैठकीमध्ये पंढरपूर एम.आय.डी. सी संदर्भात आमदार आवताडे यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींची माहिती मंत्री महोदय यांच्यासमोर मांडली. आमदार आवताडे यांनी मांडलेल्या या माहितीच्या आधारे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक शासकीय गोष्टींची पूर्तता करून पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार आवताडे यांच्या आत्तापर्यंत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसत आहे. पंढरपूर तालुका व शहर मधील युवक युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न या एम.आय.डी. सी मुळे मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यासोबत तालुक्याच्या आर्थिक समीकरणाची चाकेसुद्धा अधिक गतिमान होणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago