नर्स आणि तिच्या १२ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचा प्रकार रविवारी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उघडकीस आला होता. मात्र महिलेची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्येबाबत आरोपीने सर्वात आधी निवृत्त पोलीस अधिकारी काकाला सांगितलं होतं. तेव्हा काकाने दोघांचे मृत्यू हे आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्र फिरवत आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
नर्स सीमा आणि तिचा १२ वर्षीय मुलगा आदित्य यांचे मृतदेह रविवारी सापडले होते. सीमाचा मृतदेह बेडवर पडला होता, तर आदित्य गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. याची सूचना सीमाच्या प्रियकराचा काका आणि निवृत्त पोलीस अधिकारी जगदिशने बिल्हौर पोलिसांना दिली होती.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना संशय आला. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असता अहवालातून दोघांच्या हत्येच्या संशयाला दुजोरा मिळाला. दोघांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता शेजारी राहणाऱ्या नरेंद्रसोबत सीमाचे प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांना समजलं. तर नरेंद्र हा जगदिशचा पुतण्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी नरेंद्रला हिसका दाखवताच त्याने घडाघडा सगळी हकिगत सांगितली.
सीमा कन्नौजमधील जलालाबादमध्ये स्टाफ नर्स होती. तिचा पगारही चांगला होता. पाच वर्षांपूर्वी तिचे नरेंद्रसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती पती दिवाकरला सोडून नरेंद्रसोबत बिल्हौरमध्ये राहू लागली. भाड्याने खोली घेऊन ते एकत्र राहत होते. सीमाचा मुलगा आदित्यही त्यांच्यासोबत आला.
सीमाने दिवाकरला घटस्फोटाचे कागद पाठवून दिले. तिने मुलाला नरेंद्रला बाबा म्हणायला सांगितलं. मात्र पाच वर्ष होत आली, तरी नरेंद्र लग्नाचं नाव काढत नव्हता. ती त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. सीमाच्या सततच्या लकड्याला नरेंद्र कंटाळला. एके दिवशी भडका उडाला आणि रविवारी सकाळी त्याने सीमाचा गळा आवळून जीव घेतला. हा प्रकार आदित्यने पाहिला. त्यामुळे नरेंद्रने त्याचाही खून केला.
सीमाचा मृतदेह त्याने तसाच बेडवर पडू दिला. तर आदित्यला उचलून पंख्याला गळफास लावला. सीमाने मुलाची हत्या करुन आत्महत्या केली, असा बनाव त्याला रचायचा होता. याविषयी त्याने पोलीस काकाला खरंखुरं सांगितलं. त्यानुसार काकानेही बिल्हौर पोलिसांना दोघांच्या आत्महत्येची माहिती दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…