Categories: Uncategorized

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांना जीपॅट डिस्कशनचा पुरस्कार

सांगोला : फार्मास्युटिकल शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी उत्कृष्ट
कार्य  आणि सक्षम समर्पण पाहून जीपॅट डिस्कशनचा पुरस्कार फॅबटेक कॉलेज ऑफ
फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार
जीपॅट डिस्कशन सेंटर प्रा.ली.यांच्यातर्फे देण्यात आला.

     डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून
आत्तापर्यंत त्यांनी रिसर्च पेपर्स ११६ रिव्हिव्ह आर्टिकल १०, रिसर्च
पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स ४, पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच
 त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण
पूर्ण केले आहे. ९  विद्यार्थी  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एचडी करीत
आहेत. १ पी एचडी अवॉर्ड झाली आहे. त्यांची ५  पुस्तके प्रकाशित आहेत, २
पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४०
ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी
बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु
विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना  मान्यता मिळाली आहे.
त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे.

        डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम
मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर,
रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच
त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल
अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड  तसेच ‘बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२’चा
बहुमान, बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड
यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट  पुरस्कार  आणि आता जीपॅट डिस्कशनचा
पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त
केले.

     संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री
अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री
संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ.संजय बैस यांचे अभिनंदन केले.

👉A TATA Product
👉टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
👉डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
👉संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
👉सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
👉बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago