ताज्याघडामोडी

आईनेच पोटच्या दोन मुलांचा जीव घेतला, धक्कादायक घटना; मुलं झोपेत असताना…

औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आईने मुलांची हत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आपल्या दोन अल्पवयीन मुलांचा ते झोपेत असताना आईनेच त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सादात नगरच्या गल्ली नंबर तीनमध्ये ही घटना घडली आहे. दोन मुलं बेशुद्ध असल्याची माहिती पोलिसांना काल रात्री मिळाली होती. कुटुंबीयांना त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेलं. पण त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. अदिबा फहाद बसरावी (वय -६ वर्षे), अली फहाद बसरावी (वय -४ वर्षे) (दोन्ही राहणार सादातनगर, औरंगाबाद) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आलीया फहाद बसरावी (वय – २२ वर्ष (रा. सादातनगर, गल्ली नंबर-३,रेल्वे स्टेशन परिसर) असे हत्या करणाऱ्या निर्दयी आईचे नाव आहे.

सोमवारी सकाळी लवकर शाळेत जायचे असल्याने रविवारी रात्री आदीबा आणि आली दोघानी नित्याप्रमाने घरच्यासह जेवण केले व दोघेही झोपी गेले. मात्र सकाळी ते त्यांच्या खोलीतून बाहेर आलेच नाही. आई आलिया देखील त्याच खोलीत होत्या. दुपारी १२ वाजता आलिया या घराबाहेर आल्या तेंव्हा दोन्ही मुलं खोलीत बेशुद्धअवस्थेत खोलीत पडलेले घरच्यांना दिसले. घरच्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात हलविले. मात्र दुपारी दीड वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दिवसभर या प्रकरणी नातलगांना कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, शविच्छेदनानंतर प्राथमिक अहवाल प्राप्त झाला तेंव्हा सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. दोघांचा मृत्यू नका तोंड दाबल्याने झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी कुटुंबातील अनेक व्यक्तींची चौकशी केली.

दरम्यान, रात्री उशिरा या घटनेची माहिती समोर आली. झोपेत असलेल्या मुलांची आईनेच कापडाने नाक तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर ती तेथेच मृतदेहाजवळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत बसली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून निर्दयी आईला अटक केली आहे. मात्र, पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या आईने का केली? याचे कारण समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

👉A TATA Product
👉टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
👉डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
👉संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
👉सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
👉बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago