ताज्याघडामोडी

प्रेयसीला भेटायला गच्चीत, तितक्यात मुलीची आई आली; प्रियकर घाबरला अन् नको ते करून गेला

कायद्याचा अभ्यास करत असलेल्या तरुणानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रेयसीला भेटायला गेलेला तरुण तिच्याशी गच्चीत गप्पा मारत होता. त्यावेळी तिथे तरुणीची आई आली. तिनं दोघांना पाहिलं. त्यामुळे प्रियकर घाबरला. त्यानं गच्चीतून उडी घेतली. त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मरण पावला. तमिळनाडूतील सलेममधील चिन्ना कोलपट्टी परिसरात ही घटना घडली.

दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव संजय आहे. १८ वर्षांचा संजय चेन्ना कोलपट्टीमधील सेंट्रल लॉ कॉलेजात शिकत होता. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीशी संजयचे प्रेमसंबंध होते. दोघे आधी एकाच शाळेत होते. संजय राहत असलेल्या परिसरातच तरुणी वास्तव्यास होती. तिच्यासोबत तिची आई आणि बहिण राहते.

शनिवारी सकाळी संजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या इमारतीत गेला. जिना चढून तो गच्चीत पोहोचला. तिथे प्रेयसी त्याला भेटायला आली. त्याचवेळी मुलीची आईदेखील गच्चीत आली. आपण पकडले जाऊ या भीतीनं संजयनं गच्चीतून उडी मारली. त्याचं डोकं जमिनीवर जोरात आदळलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सालेम सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago